जम्मू-काश्‍मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडले

भारतीय लष्कराला मोठे यश, तीन दहशतवादी फरार

श्रीनगर: नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले आहे. जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिह्यातील हंदवाड्यात लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईदरम्यान या दहशतवाद्यांना पकडले. हे भारतीय लष्कराला मिळालेले मोठे यश आहे. सर्व दहशतवादी हे नवीन दहशतवादी संघटना “अल बद्र’चे दहशतवादी आहेत.

यावेळी या दहशतवाद्यांसोबत असलेल्या अन्य तीन दहशतवादी तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले. लष्कराने त्यांची शोधमोहीम सुरु केली आहे. पोलीस, लष्कर आणि अतिरेक्‍यांमध्ये थोडी चकमक झाल्यानंतर दहशतवाद्यांना शरणागतीसाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर नव्याने दहशतवादी झालेल्या चौघांनी शरणागती पत्करली.

श्रीनगरचे लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अल बदरचे सात दहशतवादी सीमारेषा ओलांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लष्कराने संयुक्त अभियान सुरू केले. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी सापळा रचून दहशतवाद्यांना घेरले. लष्कराच्या कारवाईनंतर थोडा वेळ तेथे गोळीबार झाला. मात्र नंतर लष्कराच्या आवाहनानंतर चार दहशतवादी शरण आले. पण गोळीबार सुरू असताना तीन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. सध्या परिसरात पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्याकडील शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)