जम्मू काश्‍मीरमधील चकमकीत हिज्बुलचा कमांडरसह 3 दहशतवादी ठार

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या स्वयंघोषित कमांडरसह तीन दहशतवादी आज मारले गेले. यासिन इट्टू उर्फ गझनवी, असे ठार झालेल्या हिज्बुलच्या कमांडरचे नाव आहे. ही चकमक काल रात्री सुरु झाली होती. या चकमकीदरम्यान लष्कराचे दोन जवानही शहिद झाले होते.

शोपियनमधील अवनिरा गावात काही दशतवादी लपून बसल्याचे समजल्यावर जम्मू काश्‍मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्याअ “स्पेशल ऑपरेशन ग्रुप’ने येथे कारवाईला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाच जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा नंतर मृत्यू झाला. म्हणून सुरक्षा रक्षकांनी ही कारवाई पहाटेपर्यंत स्थगित केली आणि पहाटेच्या सुमारास पुन्हा कारवाईला सुरुवात केली. दोन्ही बाजूंकडून झालेल्या तुफान गोळीबारानंतर लपून बसलेले तिन्ही दहशतवादी मारले गेले. यामध्ये हिज्बुलचा तंत्रज्ञानविषयक तज्ञ इरफान आणि गझनवीच्या सुरक्षा रक्षक उमर या दोघांबरोबर गझनवीही मारला गेला.

इट्टू उर्फ गझनवी हा मूळचा बडगाम जिल्ह्यातला होता. 2016 साली ठार झालेला हिज्बुलचा कमांडर बुरहान वानीचा तो साथीदार होता. 1996 साली त्याने आत्मसमर्पण केले होते. त्याला 2014 साली पॅरोल मिळाला होता. त्यानंतर तो पुन्हा दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)