जम्मू काश्‍मीरचे प्रशासन निवडणुकीसाठी तयार – सत्यपाल मलिक

जम्मू: जम्मू काश्‍मीरचे प्रशासन राज्यात विधानसभेच्या निवडणूक घेण्यास सज्ज आहे असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही आमच्या सिद्धतेची माहिती निवडणूक आयोगाला दिली असून ते ज्यावेळी म्हणतील त्यावेळी आम्ही राज्यात निवडणूक घेऊ शकतो.

राज्यात लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिन्यांसाठी असून त्याची मुदत मे महिन्यात संपणार आहे त्यामुळे मे महिन्याच्या आतच तेथे निवडणूका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कदाचित लोकसभा निवडणुकीपुर्वीच तेथे विधानसभेच्या निवडणूका होऊ शकतील असे संकेत निवडणूक आयोगाने आधीच दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका आता केव्हा जाहीर होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)