जम्मू-काश्मीर: हंदवाडात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : हंदवाडा येथे सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री हंदवाडा येथील काझीबाद जंगलात लष्कराच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला होता. त्यावेळी जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्वरीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्याचवेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या एका कॅम्पवर निशाणा साधला होता. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आले आणि विविध ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)