जम्मू-काश्मीर लवकरच पूर्वपदावर येईल : लष्करप्रमुख

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले आणि इतर कारणांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये असलेले तणावपूर्ण वातावरण लवकरच निवळून सामान्य स्थिती पुन्हा येईल, असा विश्वास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी व्यक्त केला.

दिल्लीमध्ये आयोजित जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या स्मरणोत्सवाच्या कार्यक्रमात रावत बोलत होते. राज्यातील काही युवकांना कट्टरवादाकडे वळवले जात आहे, पण बंदुकीच्या मदतीने दहशतवादीच काय पण सैन्यदेखील त्यांचे उद्दिष्ट प्राप्त करू शकत नाही, हे त्यांना लवकरच कळेल. सामूहिक प्रयत्नानेच शांतता प्रस्थापित होईल, असा आशावाद रावत यांनी व्यक्त केला.

-Ads-

जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या दोन बंदुकींच्या प्रतिकाचा अर्थ शांतताच असल्याचे सांगितले. प्रतिकातील बंदुकांची तोंडे एकमेकांपासून दूर असून ते शांततेचे प्रतिक आहे. ज्याच्याकडे शस्त्र आहे ते संरक्षणासाठी असून कुणालाही इजा करण्यासाठी नाही, हेच या प्रतिकातून हेच दिसते. आपण हे आदर्श पाळणे आवश्यक आहे, असे रावत म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)