जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांकडून ‘स्नायपर’चा वापर

नवी दिल्ली: जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये या आठवड्यात सैन्यदलाच्या एका जवानासह, पॅरामिलिट्रीच्या २ अधिकाऱ्यांची दहशतवाद्यांकडून लांब पल्ल्याची बंदूक वापरून हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून लांब पल्ल्याच्या ‘स्नायपर’ बंदुकांचा वापर केला जात असल्याने सैन्य गुप्तचर विभागाकडून खोऱ्यामध्ये ‘स्नायपर’ चालवण्यात तरबेज असलेले काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असे ‘स्नायपर’ चालवण्यात तरबेज असलेले दहशतवादी एकाच ठिकाणी जास्त वेळ दबा धरून बसतात आणि आपले काम पूर्ण झाल्यानंतर निघून जातात. लपून बसून हल्ला करत असल्याने अशा स्नायपरधारी दहशतवाद्यांना पकडणे कठीण असते. खोऱ्यामध्ये अशा स्नायपरधारी दहशतवाद्यांची उपस्थिती ही येथील महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण करणारी आहे, असे देखील सैन्य गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्नायपरद्वारे केलेल्या भ्याड हल्ल्यात काल सीआयएसएफच्या असिस्टंट सब इंसस्पेक्टर राजेंद्र प्रसाद यांना वीरगती प्राप्त झाली होती. अशाच अन्य दोन हल्ल्यांमध्ये आणखीन दोन जवान शाहिद झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)