जम्मू काश्मीरमध्ये शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात

जम्मू काश्मीरमध्ये सध्या शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज सोमवारपासून झाली. मतदानाची वेळ सकाळी सात ते चार अशी ठरवण्यात आली आहे. ४.४२ लाख लोक ५४८ मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. यानंतर मनमोजणी प्रक्रिया २० ऑक्टोबरला होईल.

दहशतवाडी संघटनाच्या धमक्यानंतर तेथे काही दहशतवादी कारवाया होऊ शकतात त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी बंदोबस्त केले गेले आहेत. परंतु, तेथिल जनतेला या गोष्टींची पुरेशी कल्पनाच नसल्याची बाब पुढे आली आहे. अनेक लोकांना आपल्या प्रदेशातील उमेदवार कोण आहे हे देखील माहिती नाही तर अनेकांनी मतदानाची तारीख माहिती नव्हती अशी तक्रार केली आहे. श्रीनगरमधील निवसी सुहैब अहमद यांनी माहिती दिली की, त्यांच्या  भागातील लोकांना माहिती नाही की उमेदवार कोण- कोण  आहे

जम्मू – कश्मीरच्या  प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात सुरक्षेचे बंदोबस्त केले आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्या आणि दहशतवादी कारवाई यांची भीती न बाळगता  तेथील लोक मतदान करण्यास समोर आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)