जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फुटीरतावाद्यांचा स्वातंत्र्याचा नारा

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांनी स्वातंत्र्याचा नारा देत पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याची घटना सोमर येत आहे. जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता आसिया अंद्राबी यांनी शुक्रवारी पाकिस्तानचा झेंडा फडकावत स्वातंत्र्याची मागणी केली. यावेळी, त्याने जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याच्या घोषणाही दिल्या.

भारत जबरदस्तीने हा भाग बळकावत आहे. प्रत्येक मुसलमान असो किंवा ‘काफीर’ तो मुस्लिम देशाचा नागरिक आहे आणि तो मुस्लिम देश म्हणजे पाकिस्तान आहे, तसेच पाकिस्तानची निर्मिती राष्ट्राच्या आधारावर नाही तर इस्लामच्या पायावर झाली असल्याचे आसियाने यावेळी म्हटले.  या घटनेनंतर आसियाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

आसियाने हे कृत्य काही पहिल्यांदाच केलेले नाही. याआधीही आसियाने ऑगस्ट २०१७ जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावत पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले होते.’द्राबी दुखतरान-ए-मिल्लत’ (देशाची मुलगी) नावाच्या एका संस्थेचा आसिया हा प्रमुख आहे. ही एक फुटीरवातावादी संघटना आहे, जी उघडपणे पाकिस्तानमध्ये जाण्याची भाषा करताना दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)