जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : दोन जणांचा मृत्यू तर तीन जखमी

नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समोर येत आहे. श्रीनगरस्थित करफल्लीमध्ये हा हल्ला झाला असून यामध्ये दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या नागरिकांचा राजकीय व्यक्तींशी संबंध होता. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात अाली आहे. या निवडणुकीमध्ये सहभागी न होण्यासाठी दहशतवाद्यांकडून नागरिकांना वारंवार धमकवण्याचे प्रकार समोर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)