जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद 

file photo

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. या चकमकीत तीन  दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून मृतांमध्ये हिजबुल कमांडर जहूर ठोकर याचाही समावेश आहे. यामध्ये एक सैनिक शहीद झाला. सध्या परिसरात शोधमोहीम चालवली जात आहे.

पुलवामास्थित सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पहाटेच्या सुमारास पोलीस आणि सैन्याने या भागात संयुक्त शोधमोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर सैन्यातीन एका जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)