जम्मू काश्मीरमध्ये जवानांकडून दहशतवाद्याचा कंठस्नान

शोपिया/कुपवाडा :  जम्मू काश्मीरमध्ये सतत होत असलेल्या दहशतवादी कारवायांची संख्या वाढतच आहे. त्यातच आज सकाळदेखील शोपिया जिल्ह्यात पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातही जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान, जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

शोपियांतील अहगाम येथे जवानांचे पथक गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आणि सडेतोड प्रत्युत्तरदेखील दिले. काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दीन  या दहशतवादी संघटनांनी अनेक अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)