जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी करणार आघाडी? 

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू होऊन आता सहा महिने उलटले आहेत. परंतु, आता जम्मू-काश्मीरमधील अनिश्चिततेचा काळ संपुष्टात येणार असून लवकरच आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांनुसार, या आघाडीत काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष (पीडीपी) सामील होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस हायकमांडनेही हिरवा झेंडा दाखविला आहे. यासंबंधीची घोषणा गुरुवारी होण्याचे अंदाज सूत्रांनी वर्तविले आहेत.

दरम्यान, युतीत जे हेतू होते ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत, जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडले  होते. भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले. पीडीपी सरकारला राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पाठिंबा दिला नाही. यामुळे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)