जम्मू-काश्मीरमधील चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान : एक जवान शहीद 

file photo

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले तर एक जवान शहीद झाला आहे.

कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या परिसरात शोधमोहीम राबविताना दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास चालू केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर यामध्ये एक जवान शहीद झाला.

-Ads-

तर दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यात त्राल परिसरात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत सुरक्षा दलांनी जानेवारीपासून आतापर्यंत २५० दहशतवाद्यांना ठार केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)