जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

बडगाम परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानुसार परिसरात सुरक्षा दलानी शोधमोहीम सुरु केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा भाचा उस्मान हैदरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)