जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी दिला पदाचा राजीनामा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या रिक्त जागेवर आता कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री असणार आहेत. कविंद्र गुप्ता सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या आज मंत्रिमंडळात फेरबदल करणार असून यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल एन.एन.व्होरा आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. दरम्यान, कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये भाजपाच्या काही मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन केल्यानंतर या भाजप मंत्र्यांवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर ९ राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)