जम्मूमध्ये गाढव देणार नायब तहसीलदार पदाची परीक्षा?

श्रीनगर:  जम्मू काश्मीर सरकार लवकरच नायब तहसीलदार पदासाठी प्रवेश परीक्षा घेणार आहे. यासाठी छापण्यात आलेल्या एका प्रवेशपत्रावर चक्क गाढवाचे चित्र छापण्यात आले आहे. सध्या हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  दोन वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गायीचा फोटो असलेले प्रवेशपत्र छापले होते. या ‘गाढव’पणात आता सरकारी कर्मचाऱ्यांनी भर घातली आहे.

जम्मू आणि काश्मीर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने ‘काचूर खार’ नावाने प्रवेशपत्र तयार केले आहे. यावर एका गाढवाचा फोटो आहे. रविवारी जम्मू काश्मीरमध्ये नायब तहसीलदार पदासाठी परीक्षा होत आहे. आता या परीक्षेला हे गाढव येणार की या गाढवपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार?, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ट्विटर सध्या या प्रवेशपत्राची जोरदार चर्चा आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)