जम्मूत पीडीपी नेत्याची गोळ्या झाडून हत्या

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी नेते गुलाम नबी पटेल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर येत आहे. पुलवामा येथील राजापोरा येथे दहशतवाद्यांनी गुलाम नबी पटेल यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते. गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान जखमी अवस्थेत गुलमा नबी पटेल यांना रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

राजपोरा चौकात गुलाम नबी पटेल यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात इम्तियाज अहमद आणि बिलाल अहमद मिर हे दोघे खासगी अंगरक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)