जम्मूतील ४ हजार तरुणांचे लष्कराशी जुळले सूर

श्रीनगर : एरव्ही काश्मिरी तरूण लष्कराच्या विरोधात दगडफेक करायला पुढे असतात. पण उरीमधल्या स्थानिक काश्मिरी तरूणांनी हातात चक्क क्रिकेटची बॅट आणि बॉल धरत लष्कराशी आपले सूर जुळवून घेतले असल्याचे दिसत

आहे.
भारतीय लष्कर आणि काश्मिरी तरूण यांच्यातले नाते या क्रिकेटने आखणी आणखी दृढ झाले असल्याचे दिसले. 17 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत रंगलेल्या उरी प्रीमीयर लिग क्रिकेट टी 20 सामन्यांमध्ये  तब्बल 50 काश्मिरी संघांनी भाग घेतला. भारतीय लष्कर, असीम संघटना आणि काळा पहाड ब्रिगेड यांच्या पुढाकाराने उरी चायनीज क्लब ग्राऊंडवर पार पडलेल्या या क्रिकेट सामन्यांमध्ये तब्बल 4 हजाराहून अधिक काश्मिरींनी सहभाग घेतला. नंबाला स्टार्स ही टीम या क्रिकेट स्पर्धेची विजेती ठरली. बारामुल्लाचे कोअर कमांडर मेजर जनरल आर. पी. कलिता यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. ही विजेती टीम येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यामध्ये येणार असून, त्याठिकाणी उरी इलेव्हन विरूद्ध पुणे इलेव्हन असा सामना रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)