जम्मु काश्‍मीरात स्थीर सरकार देऊ – राम माधव

जम्मू: जम्मू काश्‍मीरातील निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असून आम्ही तेथे अन्य मित्र पक्षांच्यावतीने स्थीर सरकार देऊ असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केले आहे. या राज्यात आता विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्याच्या तयारीसाठी ते येथे आले आहेत.

आज येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही राज्यातील सर्व जागा लढवणार आहोत. आम्हीच येथे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून विजयी होऊ. पण सरकार बनवण्यासाठी आवश्‍यकतेनुसार अन्य छोट्या पक्षांची मदत घेऊ असे ते म्हणाले. या राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबरच घ्यावी की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे आमची कशालाही तयारी आहे असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. भाजपच येथील विधानसभेच्या निवडणुकला अडथळा आणीत आहे या आरोपात तथ्य नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)