जमीन व्यवहारांतील गुन्हे रोखण्याचे आव्हान

पुरंदर तालुक्‍याती स्थिती; सासवड पोलीस ठाण्यात नवे पोलीस निरीक्षक

काळदरी – पुरंदर तालुक्‍यासह लगतच्या परिसरात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पांमुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी गुंठेवारीला चाप लावलेला असला तरी एकरी जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. परंतु, मोठ्या रकमचे व्यवहार असल्याने टोकण, घेणी-देणी अशा काही करणातून गुंतवणुकदारांत अंतर्गत कलह वाढीस लागला आहे तसेच तालुक्‍यासह परिसरात जमीनीच्या व्यवहारातून जादा फायदा मिळवण्यासाठी अशा व्यवहारांत फसवणुकीचे प्रमाणही अधिक आहे. या गोष्टी लक्षात घेता जमीनीच्या वादातून होत असलेले गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान तालुक्‍यातील पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सासवड पोलीस ठाण्यातील क्रांतीकुमार तानाजी पाटील यांची बदली झाली आहे तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील मुगूटलाल भानुदास पाटील हे सासवड पोलीस ठाण्यात आले आहेत. सासवड पोलीस ठाण्याला कडक शिस्त लावून क्रांतीकुमार पाटील गेल्याने येथे आलेले मुगूटलाल पाटील यांच्यापुढेही ही शिस्त कायम ठेवण्याचे आव्हान असेल. सासवड ठाण्यांतर्गत दाखल होत असलेल्या गुन्ह्यात जमिनीच्या व्यवहातून येत असलेल्या फिर्यादीचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नव्या पाटलांपुढे अशा गुन्ह्यांना रोखण्याचे मोठे काम असेल.

पुरंदर तालुक्‍यात होत असलेल्या विमानतळाच्या यापर्श्‍वभुमीवर जमीनीच्या व्यवहारांतून तसेच तत्सम कारणांतून घडत असलेल्या गुन्ह्यांबाबत पोलीसांनी सांगितले की, जमीन-खरेदी विक्रीत शासकीय कायदे कडक करण्यात आल्याने त्यातून पळवाटा शोधण्याचे काम काही मंडळी करतात. जमीन खरेदी-विक्री व्यवहार लक्षात घेतले तर असे व्यवहार एजंटांच्या मदतीने होतात. तालुक्‍यांत जमिनींचा एकरी भाव वाढल्याने कुठलाही जमीन खरेदी-विक्री व्यवहार कोट्यवधींचा होत असल्याने असे व्यवहार एजंटांच्या माध्यमातूनच केले जात आहेत. या व्यवहारात मोठे एजंट तालुक्‍यातील एजंटांना “थर्ड पार्टी’ म्हणून घेतात; परंतु, अशा साखळीमुळे व्यवहारांमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्‍यता अधिक असल्याने यासंदर्भातील गुन्हे वाढीस लागले आहेत.

इनव्हेस्टमेंटसाठी रेडी…
पुरंदर तालुक्‍यात जमीन विक्रीचे व्यवहार करणाऱ्या कही एजंटांशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरात अशा व्यवहारांना वेग येवू लागला असून उलाढाल वाढू लागल्याचे समजते. पुणे, मुंबई या सारख्या शहरांबरोबरच राज्याबाहेरील काही गुंतवणुकदार तालुक्‍यात इनव्हेस्टमेंटसाठी रेडी असल्याचे हे एजंट सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)