जमीन खरेदी करण्यापूर्वी हे वाचा

जमीन, जागा, घरे आदी मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या शक्‍यता अनेकदा असतात. प्रॉपर्टी डेव्हलपमेन्ट क्षेत्रात नफा अधिक असल्यामुळे अनेक जण या व्यवसायात उतरले असून, जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता गुंतवणूक करण्यापूर्वीच घ्यायला हवी. त्यासाठी काही गोष्टींचे ज्ञान असणे आणि योग्य सल्ला घेणे आवश्‍यक असते. गेल्या काही वर्षांपासून जमीन, जागा, घरे, फ्लॅट आदी स्थावर मालमत्तांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. त्याचबरोबर इच्छुक खरेदीदारांची व्यवहारात फसवणूक होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

कष्टाची कमाई खर्च करून मालमत्ता खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यासाठीच अशा मालमत्तांची खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे असते. कागदपत्रांबाबत जाणून घेण्याबरोबरच खरेदीच्या व्यवहारात योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्‍यक असते. त्यासाठी योग्य प्रक्रिया आधीसमजून घेतली पाहिजे.

एन्कम्ब्रॅन्स सर्टिफिकेट (ई. सी.) : या दस्तावेजात पूर्वी झालेल्या व्यवहारांची नोंद केलेली असते. जमीन अथवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दस्तावेज असणे अनिवार्य मानले जाते. या दस्तावेजासाठी नोंदणी कार्यालयाजवळ ऑनलाइन अर्जाची सुविधाही अनेक राज्यांमध्ये आजकाल उपलब्ध करण्यात आली आहे. येथून अर्जदाराच्या घरी हा दस्तावेज पाठविला जातो. या बाबतीत तमिळनाडू सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे.

पट्टा : पट्टा हा जमिनीवरील मालकी हक्क दर्शविणारा दस्तावेज आहे. ज्याच्या नावावर जमिनीची नोंद केलेली असते, अशा व्यक्तीच्या नावाने हा दस्तावेज महसूल विभागाकडून जारी करण्यात येतो. या दस्तावेजाखेरीज जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येत नाही. पट्टा या दस्तावेजात जमिनीच्या मालकी हक्काबरोबरच, चतुःसीमा आणि अन्य उपयुक्त माहिती असते. जमिनीच्या संदर्भातील सर्व रेकॉर्ड या दस्तावेजात असल्यामुळे संबंधित जमिनीवर बांधलेल्या इमारतीचे विवरणही या दस्तावेजात असू शकते.

प्लॉट खरेदी करताना हे तपासा…
1. जमीन मालकाकडे जमिनीचा निर्विवाद मालकी हक्क असला पाहिजे.
2. जमिनीच्या लेआउट नकाशाला विकास प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची मंजुरी असली पाहिजे.
3. परिसरातील रस्ते किंवा बागांसाठी राखीव भूखंडांचे हस्तांतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडे केले आहे की नाही, हे तपासले पाहिजे.
4. प्लॉटसाठी भूमापन आणि मास्टर प्लॅनसहित अन्य सर्व परवानग्या घेतलेल्या असल्या पाहिजेत.
5. प्लॉटशी संलग्न असलेल्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे का, हे जाणून घेतले पाहिजे.

गाइडलाइन व्हॅल्यू (संभाव्य मूल्य) :
1. दळणवळणाची साधने, बाजारपेठेपासून निकटता अशा बाबी विचारात घेता संबंधित जमिनीचे मूल्य काय आहे, हे गाइडलाइन व्हॅल्यू किंवा संभाव्य मूल्यावरून लक्षात येते.
2. अनेक राज्यांनी सर्व विभागांसाठी गाइडलाइन व्हॅल्यू निश्‍चित केलेली आहे. आदर्श परिस्थितीत यावरून जमिनीच्या बाजारमूल्याचा अंदाज येतो.

– मेघना ठक्‍कर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)