जमिनीच्या वादावर चीनी राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग म्हणाले…

बीजिंग : चीनच्या हिश्श्याची एक इंच जमीन कोणाला देणार नाही. दक्षिण चीन समुद्रातील बेटांवरही चीनचाच हक्‍का राहील, अशी भूमिका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी घेतली आहे. जिनपिंग यांची चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग दुसर्‍यांदा निवड झाली. त्यानंतर ते बोलत होते.

व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनाई, तैवान आदी देशांच्या दक्षिण चीन समुद्रातील हक्‍कांवरही जीनपिंग आक्षेप घेतला आहे. भारत-चीनमधील डोकलाम तणावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी चीनची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्राध्यक्षपदावर दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहण्यासाठी चीनमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे जिनपिंग यांना आणखी कार्यकाळ मिळाला आहे.  दरम्यान, आता जिनपिंग यांच्या वक्तव्यावर भारताकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

  1. वरील बातमीपत्र वाचण्यात आले चीनच्या हिश्याची एक इंच जमीन कोणाला देणार नाही हि जर भूमिका शी जिनपिंग ह्यांची असेल तर प्रथम त्यांनी चीन चा हिस्स्स असलेल्या संपूर्ण भूप्रदेशाचा नकाशा आदीकृतरित्या प्रकाशित करावा जेणेकरून चीन व्यतिरिक्त इतर देशाना तो अभ्यासाने सहज शक्य होईल व ह्या बाबत जर इतर देशांचा आक्षेप नसेल तर चीनला देण्याघेण्याचा प्रश्नच येणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)