जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने कुटुंबाला पेटवले

सोलापूर : सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याची घटना सोलापूरमधील बार्शी येथे घडली आहे.  घर जागेच्या वादातून भावानेच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी येथील हा प्रकार आहे. दरम्याव, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश आहे.

सुषमा देवकते, आर्यन देवकते, राहुल देवकते व कुटुंबातील एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. घर जागेच्या वादावरुन भाऊ रामचंद्र देवकते याने गुरुवारी रात्री भावाच्या घरातील लोक झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतले व त्यांना पेटवले.  या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान अंत झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यातील आरोपी रामचंद्र हा देखील जखमी झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)