जमिनीच्या वादातून रॉडने मारहाण

सातारा- जमिनीच्या जुन्या वादातून एकाला लोखंडी रॉडने मारहाण झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.जयवंत बाळकृष्ण बोडके,प्रमोद जयवंत बोडके ( दोघे रा. कोंडवे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अक्षय मानसिंग बोडके (रा.कोंडवे) याने तक्रार दिली आहे. फिर्यादी व संशयीत आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहे. त्याचाच राग मनात धरून संशयीतांनी शुक्रवारी तक्रारदाराला लोखंडी रॉडने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास सातारा तालुका पोलिस करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)