जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

पिंपरी – जमिनीच्या वादातून एकाने तिघांना लाकडी बांबूने मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी आठ वाजता घडली.

मनोज रघुनाथ बोरसे (वय-49, रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलीस ठाण्यात विलास पंढरीनाथ कुटे (वय – 50, रा. निगडी, प्राधिकरण) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून कुटे यांनी रागाच्या भरात बोरसे व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लाकडी बांबू ने मारहाण केली. यामध्ये बोरसे यांचा डावा हात फ्रॅक्‍चर झाला आहे. निगडी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)