जमिनीच्या वादातून एकावर हल्ला

शिर्डी – जागेच्या वादातून टाच्या नावाच्या सनगने छातीवर वार करून एकाला जखमी केल्याप्रकरणी शिर्डी पोलीसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात जयंतीलाल पटेल यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे. माझा भाऊ मणीलाल पटेल यांनी शिर्डीतील डॉ.गोंदकर हॉस्पिटलच्या पाठीमाग बाजून असलेल्या त्यांच्या मालकीच्या जागेत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू होते. यांच्या जवळच थोरात यांनी जागा असून त्या ठिकाणी अक्षय सुदेश थोरात व संजय सखाहरी थोरात तिथे आले. कामाची चौकशी करू लागले. यावर मणीलाल पटेल म्हणाले, आमची जागा आहे, आमच्या जागेत काहीही करू तुम्ही विचारणारे कोण? असे म्हणताच अक्षय यास राग अनावर झाल्याने त्याने मणीलाल यांना शिवीगाळ करीत तिथे असलेला टाच्या नावाच्या सनग त्यांच्या छातीवर मारला. त्यांच्या छातीतून रक्त आल्याचे पाहत त्या दोघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर पटेल यांनी रुग्णालयात दाखल केले आहे. आरोपी फरार आहेत. त्यांच्या शिवीगाळ करणे गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)