जमिनीच्या आरोग्यापुढील आव्हाने, उपाययोजना (भाग चार)

     जमीन आरोग्य टिकविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना – 
 

जमीन खराब व प्रदुषीत न होण्यासाठी पर्यावरण पुरक व परवडणाज्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे. * जमिनीची जौविक सुपिकता वाढविण्यासाठी खराब जमिनीची भुसुधारके वापरुन सुधारणा करणे. * माती परिक्षणहा अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा कणा आहे. माती परीक्षणावर आधारित अन्नद्रव्यांच्या शिफारशी देणे. * जमिनीच्या उत्पादकतेच्या दृष्टीने माती, पाणी, अन्नद्रव्ये व पिके यांचा परस्पर संबंध समजावून घेणे. * कालवा सिंचन प्रदेशामध्ये क्षारयुक्त, चोपण व पाणथळ जमिनीतयार होवू नये म्हणून काटेकोर पाणी व्यवस्थापन करणे. * रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, पिकांचे अवशेष, जौविक खते यांचा वापर करुन एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे व जमिनीतीलसेंद्रिय कर्ब वाढविणे. *

वेगवेगळ्या जमीन वापर व व्यवस्थापन परिस्थितीत जमीन आरोग्य व जमिनीची गुणवत्तेत होणारे बदल अभ्यासण्यासाठी पध्दती विकसीत करणे. * जमिनीच्या क्षमतेनुसार (कॅपेबीलिटी) पिकांची व पीक पध्दतीची निवड करणे. पीक पध्दतीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाज्या पिकांचा आंतरभाव करणे. * वेगवेगळ्या कृषि पर्यावरण पध्दतीमध्ये (ऍग्रो इकोलॉजिकल सिस्टीम) जमिनीचे आरोग्य तपासणीसाठी निकष विकसीत करणे. * जमिनीतील अन्नद्रव्यांचे नियमित परीक्षण करणे व जमिनीची आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने उपायांचा अवलंब करणे. * जमिनीच्या आरोग्याचे महत्व व खराब जमिनीतयार झाल्यास होणारेतोटे याबाबींची जागृती निर्माण करणे. भविष्यातील अन्नाची मागणी, पर्यावरण सुधारणा, पाण्याची उपलब्धता व गुणवत्ता, शाश्‍वत उर्जेची उपलब्धता या सर्व गोष्टींची विश्‍वासार्ह उत्तर म्हणजे चांगले जमीन आरोग्य. यासाठी भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.

 आपण आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी खालील गोष्टी करु शकतो. 

* जमिनीवर आच्छादन, वृक्ष लागवड, सेंद्रिय खतांचा वापर करुन जमिनीतीलसेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवा. * जमिनीवरील व जमिनीखालील जौवविविधतेस चालना द्या. सूक्ष्म जीवांचे संरक्षण व संवर्धन करा. * मातीचे वाज्यामुळेहोणारी धूप व चोपणपणा टाळण्यासाठी वनस्पतीचा/वृक्षाचा कल्पकतेने वापर करा. * जमिनीवर 100टक्के वेळेला 100 टक्के आच्छादन ठेवा. * चरावू कुरणांचे योग्य पध्दतीने उपयोग करा. * जौविक खतांचा वापर वाढवा, रासायनिक खतांचा वापर आवश्‍यकतेवढाच करा, अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करा.

प्रा. संजय तोडमल
व डॉ. सचिन सदाफळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)