खतांचा वापर –
भारतात खतांची मागणी व खत वापर सतत वाढत आहे.नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांची मागणी वाढत असलीतरी पीक उत्पादकतेमध्ये घट नोंदविली गेलीआहे.भारतामध्ये सुरुवातीपासूनच असंतुलीत खत वापर होत आहे. यामध्ये नत्र व त्या खालोखालस्फुरद खताचा वापर असंतुलीत केला जातो. साधारणपणे नत्र:स्फुरद:पालाश खत वापराचे गुणोत्तर 4:2:1 असे असायला हवे.
अन्नद्रव्यांची कमतरता
खतांचा वाढता वापर आणि पिकांचा कमी कमीहोणारा प्रतिसादाबरोबरच जमिनीचे आरोग्य ढासळत चालले आहे.प्रामुख्याने असंतुलीत खत वापर आणि सेंद्रिय खतांचा कमी वापर यामुळे पीक उत्पादनात घट येत आहे.अयोग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे मातीत वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे व आढळून येणारी कमतरताही जमिनीनुसार वेगवेगळी आहे. वालुकामय जमिनीत अन्नद्रव्ये निचराहोण्याची समस्या आहे. चिकणमातीयुक्त जमिनीत निचज्याची समस्या आहे, चुनखडी युक्त जमिनीत हवेद्वारे नत्र उडून जाते, कमीसेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत जस्ताची कमतरता आढळते, भात-गहू पीक पध्दतीमध्ये लोह व मंगल अन्नद्रव्यांची कमतरता आढळत आहे. खतांचा संतुलीत व कार्यक्षम वापर करुन आपण कमीत कमी उत्पादन खर्च, जास्त आर्थिक फायदा व जमिनीच्या आरोग्यास कमीत कमीधोका इ.गोष्टी आपण साध्य करु शकतो.
जमिनीच्या आरोग्यास व उत्पादकतेस हानीकारक घटक
जमिनीच्या आरोग्यास व उत्पादकतेस जमिनी खराब होणेही एक मोठी समस्या आहे. जमिनी खराब होण्यामागे जबाबदार असलेले घटक म्हणजे पर्यावरणाचे प्रदुषण, पीक उत्पादकतेत घट, जंगलतोड, अकृषि जमीन वापर, पाणथळ जागेत पाणीसाठणे, क्षारयुक्त व चोपण जमिनींची निर्मिती, पावसाच्या पाण्याचे नियोजन न करणे,शेतीमध्ये रसायनांचा वापर इ. हे आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा