जमिनीच्या आरोग्यापुढील आव्हाने, उपाययोजना (भाग एक)

सध्या अनेक विकसनशील राष्ट्रांपुढे अन्न, तंतुमय पिके, चारा, इंधन, उत्पन्न, दरडोई क्षेत्र, पिण्यायोग्य व शेतीयोग्य पाण्याची उपलब्धतता या समस्या आहेत. पुढील काळात आज उपलब्ध असलेल्या शेती योग्य जमिनीतूनच पिकाची उत्पादकता, रोजगार इ.मिळवावा लागेल.

दरडोई जमिनीचे क्षेत्र 0.30 हे (1950-51) वरुन 0.15 हे (2000-01) कमीझाले आहे. येणाज्या काळातते 0.08 हे (2015) वरुन 0.07 हे (2030) पर्यंत खाली येईल असा अंदाज आहे. जगाच्या तुलनेत भारताकडे असलेल्या 2 % जमिनीतुन 17 % लोकसंख्येची 16 % पशुधनाची गरज भागविली जाते. असे असलेतरी जमीन, हवामान, मृदा प्रकार यांच्या मध्ये असलेल्या विविधतेमुळे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे शेती उत्पादन घेण्यास वाव आहे.

  जमिनीच्या सुपिकतेत झालेला बदल

भारताचा जमिनीचीसुपिकता दर्शविणारा नकाशा 1967 साली प्रसिध्द झाला. त्यावेळी केवळ 4 % मृदा नमुन्यांमध्ये स्फुरद अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त होते. सन 2002 मध्ये प्रसिध्द झालेल्या सुपिकता दर्शविणाज्या नकाशामध्ये 20 % माती नमुन्यांतस्फुरद अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. यावरुन असे दिसून येते कीस्फुरदयुक्त खतांच्या सततच्या वापरामुळे भारतातील जमिनींमध्येस्फुरद अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकज्यांनी माती परिक्षणावर आधारित खत वापर केल्यास आपण भविष्यात स्फुरद युक्त खतांची बचत करु शकतो. मातीमध्ये नत्राची कमतरता भविष्यात जाणवत राहील. कारण भारतातील जमिनींमध्येसेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमीते मध्यम प्रमाणात आहे. मृद परीक्षणाच्या आधारे भारतातील जमिनींमध्ये पालाशचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.

प्रा. संजय तोडमल 
व डॉ. सचिन सदाफळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)