जमिअत-ए-इस्लामी हिंद तर्फे ‘नशा विरोधी जनजागृती’

निगडी – जमिअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र आकुर्डी शाखेच्या वतीने नशा विरोधी अभियानांतर्गत शहरात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. “नशेचा नाश : देशाचा विकास’ या ध्येयाने आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, निगडी परिसरातील विविध शाळा, मस्जिद, झोपडपट्टीतील युवकांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर, पत्रके आणि व्याख्यानांद्वारे प्रबोधन केले. शाळेतील विद्यार्थी, पालक, नागरीक यांना नशेपासून होणारे धोके, घ्यावयाची काळजी, व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. यावेळी नशा विरोधी आकुर्डी शाखेचे अध्यक्ष मुसा शेख म्हणाले की, आजचा तरूण उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहे. सक्षम, आरोग्यदायी, सुदृढ मुले ही देशाची संपत्ती आहे. व्यसनामुळे घर, कुटुंबच नव्हे, तर देशाची अधोगती होते. देशाला समृध्द व विकसित करण्यासाठी तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. जमिअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र वतीने आकुर्डी शाखेच्या मोहिमेला विद्यार्थी, पालक, कर्मचारी वर्ग, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्हा संघटक एम. आय. शेख, पुणे व पिंपरी चिंचवड महिला संघटक नजमा, नाशिम, शुकरूल्लाह, लाहिक अहमद, हूर खान, युसुफ मेनन, सुलतान मुलाणी, खाजा पटेल, हाफिज शेख, जावेद शेख, साजिद शेख यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)