जमावाची पोलिसांवर दगडफेक

फलटण  – गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेल्या स्वराज संघटनेचे दिगंबर आगवणे यांनी शुक्रवारी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर प्रक्षुब्ध आगवणे समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासह अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत. या घटनेमुळे फलटण तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 17 नोव्हेंबरपासून विविध मागण्यांसंदर्भात फलटण येथील स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर रोहिदास आगवणे रा. गिरवी, ता. फलटण हे बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या पोलिसांकडून मान्य करण्यात आल्या होत्या. परंतु, लोणंद, ता. खंडाळा येथील एका गुन्ह्यात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती.

पोलिसांनी आगवणे यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र, ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, तसेच पोलिसांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यास मी विषा पिऊन आत्महत्त्या करेन, असा इशाराही दिला होता. उपोषणाचा काल सहावा दिवस होता. दिगंबर आगवणे उपोषण स्थळासमोर असलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीत बसलेले होते. त्यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत उपोषणस्थळी आले. त्यांनी दिगंबर आगवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

यावेळी आगवणे यांनी जवळ असलेले विष प्राशन केले. कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर कार्यकर्ते लगेचच गाडीकडे धावले व त्यांनी आगवणे यांना गाडीतून बाहेर काढून येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर प्रक्षुब्ध झालेला जमाव फलटण शहर पोलिस ठाण्यात गेला व पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामुळे पोलीस निरिक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंगटे यांच्यासह काळे, मुठेसह अनेक पोलीस जखमी झालेले आहेत. याप्रकरणी दिगंबर आगवणे यांच्या पत्नी व पंचायत समिती सदस्या दिगंबर आगवणे यांच्यासह 80जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

आगवणेंच्या कंपनीला दुसऱ्यांदा आग
वाठार निंबाळकर येथील दिगंबर आगवणे यांची कंपनी कांही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झाली होती. आज पुन्हा आगवणे यांच्या कंपनीला आग लागली. फलटण नगरपालिकेचे अग्निशमन दलाने तत्काळ रवाना होवून ही आग आटोक्‍यात आणली आहे. दरम्यान, आगवणे व त्यांचे सर्व समर्थक रुबी हॉल पुणे येथे आहेत. त्यामुळे याठिकाणी फक्त एक दोन कामगार होते. फलटण नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला जास्त नुकसान न होता दिगंबर आगवणे यांच्या कंपनीला लागलेली आग आटोक्‍यात आणण्यात यश आले आहे. कंपनीचे काम आता सुरळीत चालू झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)