जमाते ईस्लामी तर्फे नशाबंदी सप्ताहाचे आयोजन

नगर – महाराष्ट्रातील किशोरवयीन मुले आणि युवकांची संपूर्णपणे सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्त करण्याचा संकल्प करून जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र आणि नशाबंदी मंडळाच्या संयुक्त वियमाने राज्यस्तरीय मोहीम दि.2 ते 8 ऑक्‍टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचे शीर्षक नशेचा नाश देशाचा विकास असे ठरवण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत आणि मोहिमेनंतर आम्ही देशातील किशोरवयीन आणि तरूण पिढीला विविध प्रकारच्या व्यसनातून मुक्त करण्याचे ध्येय आणि त्या करिता सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. आमची ठामपणे सरकारकडे मागणी आहे की, आम्हाला दारूमुक्त महाराष्ट्र हवा आहे.
संपूर्ण विश्‍वात भारताची तरूण देश म्हणून ख्याती आहे. त्याविपरीत व्यसनाधिनतेमुळे आमच्या देशात दररोज पंधरा लोक मरतात. देशाचा तरूण त्या देशाचा पाठीचा कणा असतो, देशाची शक्ती, सर्वात मोठे मनुष्यबळ, मानवसंसाधन असते. देशाच्या, समाजाच्या प्रगतीत, विकासात तरूणपिढीचा सिंहाचा वाटा असत. जर आज आपण आमच्या तरूणांना विषारी औषध, अल्कोहल, ड्रग्ज, दारू आणि धुम्रपानाच्या वाईट व्यसनांपासून वाचवू शकलो तर हीच पिढी उचा आमच्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचे हातभार लावू शकते.
याच उद्दिष्टाला समोर ठेवुन जमाअत ए इस्लामी हिंदने नशेचा नाश देशाचा विकास या शिर्षकाखाली सदर मोहिमेचे आयोजन केले आहे. दारूच्या व्यसनामुळे आज फक्त ग्रामीण भागच नव्हे तर शहरी भागसुध्दा पुर्णपणे ग्रासलेला आहे. एकीकडे सरकार व्यसनमुक्ती, दारूबंदीवर भरमसाठ पैसा खर्च करते तर दुसरीकडे दारू, विषारी औषधी (ड्रग्ज) बनविण्याची , विकण्याची आणि पिण्याची परवानगी देते. यावर पूर्णपणे, काटेकोरपणे प्रतिबंध लावण्याची गरज आहे याच प्रकारे विविध व्यसने ज्यामध्ये आजची तरूण पिढी आधिन आहे, ज्यामध्ये विषारी औषधी (ड्रग्ज), दारु व धुम्रपानाचे साहित्य इत्यादी बाजारात उपलब्ध आहेत व त्याचा वापर होत आहे. परिणामतः अत्यंत भयंकर रोग जसे कर्करोग (कॅन्सर, क्षयरोग (टी. वी.) देशात वेगाने वाढत आहेत.
दारूच्या नशेत वाहन चालवून हजारो लोक दररोज अपघातग्रस्त होऊन ठार होतात. व्यसनामुळे अनेक कुटुंब विखुरली जात आहेत. एका मयपी व्यक्तीच्या चुकीमुळे त्याचा परिवारमुले, पत्नी सर्वांना संकटात जावे.लागते. अनेक स्त्रिया आत्महत्या याच कारणामुळे करतात .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)