जमशेद गारडा, सिध्दार्थ टेंभे यांचा बाद फेरीत प्रवेश 

पहिली स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नूकर स्पर्धा 
पुणे  – पुना क्‍लबच्या जमशेद गारडा व डेक्कन जिमखाना क्‍लबच्या सिध्दार्थ टेंभे यानी आपापल्या प्रतिस्पर्धां विरूध्द विजय मिळवत द क्‍यु क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या “स्टरलाईट टेक खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद’ अखिल भारतीय खुल्या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
विमाननगर येथील क्‍यु क्‍लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुना क्‍लच्या जमशेद गारडा याने सलग दोन विजयाची नोंद करत बाद फेरी गाठली. जमशेद याने पहिल्यांदा मुंबईच्या लव बोरूचा याचा 20-52, 56-45, 61-34 असा पराभव केला. त्यानंतर जमशेद याने होरायझनच्या निखील खोब्रागडे 76-0, 80-11 याचा असा सहज पराभव करून बाद फेरी गाठली.
डेक्कन जिमखानाच्या सिध्दार्थ टेंभे यानेही सलग दोन विजयांची नोंद करून बाद फेरी गाठली. सिध्दार्थने संकेत मुथा (कॉर्नर पॉकेटस्‌) याचा 55-47, 19-48, 58-27 असा तर, अमित पराशर (क्‍यु क्‍लब) याचा 46-28, 52-34 असा पराभव करून बाद फेरी गाठली.
बाहेर गावच्या खेळाडूंनी आज स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. औरंगाबादच्या कृष्णा अरकोडे याने डेक्कन जिमखानाच्या अभिजीत रानाडे याचा 12-72, 67-23, 58-46 असा पराभव करून धक्का दायक निकाल नोंदविला. औरंगाबादचाच खेळाडू रोहन कोठारे यानेक्‍यु क्‍लबच्या पिनाक अनाप याचा 64-15, 51-15 असा सहज पराभव केला.
मुंबईच्या लव बोरीचा याने न्यु क्‍लबच्या नितेश भोसले याचा 43-32, 62-50 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेच्या गटसाखळी फेरीचा निकालः
लोगस रेगो (क्‍युक्‍लब) वि.वि. साहील लोंढे (एपीज्‌ क्‍लब) 56-22, 66-13;
रोहील गाव्हलकर (क्‍यु क्‍लब) वि.वि. आशिष हुलग (खडकी) 55-32, 31-62, 52-28;
जमशेद गारडा (पुना क्‍लब) वि.वि. लव बोरूचा (मुंबई) 20-52, 56-45, 61-34;
कृष्णा अरकोडे (औरंगाबाद) वि.वि. अभिजीत रानाडे (डेक्कन जिमखाना) 12-72, 67-23, 58-46;
रोहन कोठारे (औरंगाबाद ) वि.वि. पिनाक अनाप (क्‍यु क्‍लब) 64-15, 51-15;
अमित पराशर (क्‍यु क्‍लब) वि.वि. गिरीश जी. (सांगली) 64-64, 41-52, 66-27;
सिध्दार्थ टेंभे (डेक्कन जिमखाना) वि.वि. संकेत मुथा (कॉर्नर पॉकेटस्‌) 55-47, 19-48, 58-27;
सिध्दार्थ टेंभे (डेक्कन जिमखाना) वि.वि. अमित पराशर (क्‍यु क्‍लब) 46-28, 52-34;
विरेन शर्मा (क्‍यु क्‍लब) वि.वि. पिनाक अनाप (क्‍यु क्‍लब) 27-63, 48-14, 61-28;
निखील खोब्रागडे (होरायझन) वि.वि. नितेश भोसले (क्‍यु क्‍लब) 45-51, 68-25, 71-45;
लव बोरीचा (मुंबई) वि.वि. नितेश भोसले (न्यु क्‍लब) 43-32, 62-50;
जमशेद गारडा (पुना क्‍लब) वि.वि. निखील खोब्रागडे (होरायझन) 76-0, 80-11;

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)