जमशेदपूरमध्ये जन्मली ‘प्रियांका’…

बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांकाचा जन्म 18 जुलै 1982 ला जमशेदपूरमधील टाटा मेन हॉस्पिटलमध्ये झाला होता. याठिकाणी तिचे घर आणि आजोळही आहे.

जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा भारतीय लष्करात डॉक्‍टर होते. त्यांचे वडील अंबालाचे राहणारे होते. नोकरीतील बदलीमुळे प्रियांकाचे कुटुंब लडाख, लखनऊ, बरेली आणि पुणे सारख्या शहरांत गेले होते.

यामुळे प्रियांकाचे बहुतांश बालपण लेह, बरेली अशा शहरांत गेले. प्रियांकाला एक भाऊ असून त्याचे नाव सिद्धार्थ चोप्रा आहे. तो तिच्यापेक्षा सात वर्षांनी छोटा आहे. ऍक्‍ट्रेस परिणिती चोप्रा आणि मीरा चोप्रा या तिच्या बहिणी आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)