जबरी चोरी प्रकरणात एकाला पोलीस कोठडी

पुणे- स्कुटीवरून चाललेल्या व्यक्‍तीच्या खिशातील मोबाइल दुचाकीवरून लांबवून जबरी चोरी केल्याप्रकरणात अलंकार पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला दि. 10 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अभिषेक भरत लेकावळे (वय 19, रा. नऱ्हे), असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत आनंद सदानंद पानिभाते (वय 42, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास डी. पी. रस्त्यावर घडली. फिर्यादी स्कुटीवरून चालले होते. त्यावेळी त्यांच्या शर्टाच्या खिशात असलेला 23 हजार 800 रुपयांचा मोबाइल लांबविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी लेकावळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वैशाली पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने लेकावळे याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)