जबरी चोरी प्रकरणात आणखी एकाला अटक

पुणे – जबरी चोरी प्रकरणात आणखी एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 4 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अक्षय ऊर्फ बंटी विजय साबळे (ताडीवाला रस्ता) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी सात जणांना अटक केली असून, आणखी 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल आहेत. ही घटना 5 ऑगस्ट रोजी ताडीवाला रस्त्यावर रात्री 11 च्या सुमारास घडली. केबल कनेक्‍शन कारणावरून पूर्वी झालेल्या भांडणातून घरात घुसून मारहाण करून आरोपींनी दहशत निर्माण केली होती. केबल ऑफीसमधील 8 हजार रुपये किंमतीचा डीव्हीआरची जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अक्षय याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)