जबरी चोरी करणारे अटकेत

पिंपरी – देहुरोड परिसरात जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा दोनच्या तपासी पथकाने निगडी येथून जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) रात्री करण्यात आली.

दीपक विजय घडसिंग (वय-22) व सुनील पोपट गायकवाड (वय-21, दोघे रा. अण्णाभाऊ साठेनगर, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत.

देहुरोड पोलीस ठाणे येथे जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक व सुनील हे भक्ती-शक्ती चौकातील काळभोर हॉटेल येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक लक्ष्मण अढारी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक निरीक्षक सतिश कांबळे, उप निरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, धर्मराज आवटे, प्रवीण दळे, फारुक मुल्ला, जमीर तांबोळी आदींच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)