जबरी चोरीप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

पुणे – रिक्षातील प्रवाशाच्या बॅगसह 18 हजार 500 रुपयांचा ऐवज घेवून पळ काढणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
महादेव सुधाकर पांचाळ (वय 20, रा. लोणी काळभोर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत स्नेहल संजय चौगुले (वय 38, रा. जनता वसाहत) यांनी फिर्याद दिली. 6 मे 2018 रोजी स्वारगेट येथील मच्छी मार्केट समोर ही घटना घडली. स्नेहल या पती, मुलासह महाड येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्या रिक्षेतून जात असताना स्वारगेट येथे रिक्षाच्या उजव्या बाजूने दुचाकीवर दोघे जण आले. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने स्नेहल यांच्याजवळील लेदरची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी पांचाळ याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पांचाळ याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)