जबरी चोरीतील फरार आरोपी जेरबंद

पिंपरी – भरदिवसा चॉपरने वार करुन 4 लाख रुपयांची जबरी चोरी करून 27 जानेवारी 2015 रोजी फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने जेरबंद केले.

टिल्लु उर्फ मुजाहीद इब्राहीम औटी (वय-25, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक भोसरी पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते. यावेळी पोलीस शिपाई सुनील चौधरी यांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, जबरी चोरी प्रकरणातील आरोपी टिल्लू औटी हा नेहरुनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ येणार आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून टिल्लू याला अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी या अगोदरच रिंकू उर्फ अमर कुलवंतसिंग चौहान (रा. नेहरुनगर), रहीम नईम चौधरी (रा. शाहुनगर, चिंचवड) आणि प्रशांत पवनसिंग ठाकुर (रा. काळेवाडी) या तिघांना अटक केली होती. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने आरोपी टिल्लू याला भोसरी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, संतोष बर्गे, प्रमोद वेताळ, सावन राठोड, अमित गायकवाड, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, सचिन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)