रियो ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करूनही केवळ नशिबाने साथ न दिल्याने पदकापासून वंचित राहिलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिने तुर्कीच्या मेसनिस येथे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्‍वचषकात सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी दीपा कर्माकर ही भारताची पहिलीच खेळाडू आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे दीपा गेली दोन वर्षे मैदानाबाहेर होती.

दुखापतीतून बरे होण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली दुखापतीतून बरे होताच तिने सरावावर भर दिला जिद्द मेहनत व चिकाटी या गुणांच्या जोरावर तिने हे सुवर्णपदक मिळवले आहे हे सुवर्णपदक मिळवून तिने देशाची मान उंचावली आहे तिचे सुवर्णपदक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्रिपुरासारख्या राज्यातून एक मुलगी जिम्नॅस्टिकसारख्या अवघड क्रीडाप्रकारात नाव कमावते, ही तशी आश्‍चर्याची बाब आहे कारण जिम्नॅस्टिक हा क्रीडा प्रकार तसा आपल्याकडे दुर्लक्षित आहे दीपाच्या या कामगिरीनंतर अनेक तरुण खेळाडू जिम्नॅस्टिककडे वळतील, यात शंका नाही. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्‍वचषकात सुवर्णपदक मिळवणाऱ्या दीपाचे मनापासून अभिनंदन व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा !
– श्‍याम ठाणेदार, दौंड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)