जप्त स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती – जितेंद्र आव्हाड

मुंबई – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने शुक्रवारी हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके जप्‌ किेली आहेत. वैभव राऊतच्या अटकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केला आहे. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी वापरण्यात येणार होती. याद्वारे महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. याबाबत ट्विट करुन आव्हाड यांनी हा आरोप केला.

वैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले जवळ-जवळ क्रूड बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतकंच नाही तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी मागणीही आव्हाडांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)