जप्त प्लॅस्टिक मालाची विल्हेवाट लावायची कशी?

प्लॅस्टिकविरोधी कारवाईनंतर प्रशासनासमोर प्रश्‍न

पुणे – गेल्या काही दिवसांपासून धडाक्‍यात सुरू असलेल्या प्लॅस्टिक कारवाईने शहरातील व्यावसायिक धास्तावलेले आहे. प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यावर धडक मोहिमेअंतर्गत कारवाई करत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्लॅस्टिक जप्त करत आहे. मात्र, त्याची विल्हेवाट लावायची कशी आणि कोणी? असा प्रश्‍न या दोन्ही संस्थांसमोर उपस्थित झाला आहे. परिणामी, जमा केलेला माल अजूनही या संस्थांच्या कार्यलयात पडून आहे.

राज्य सरकारने प्लास्टिकबंदी जाहीर करून सहा महिने उलटले आहेत. राज्यात लागू झालेल्या प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत या कारवाईअंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक प्रशासकीय संस्थेच्या सहभागातून एक हजार दुकानांवर कारवाई केली आहे. यात तब्बल तीनशे टन प्लास्टिक जप्त केले असून, सुमारे 14 लाख 56 हजार रुपये दंड वसूल केला आहे. या मोहिमेअंतर्गत मंडळाने आत्तापर्यंत पुणे महापालिका, पिंपरी, आळंदी, राजंणगाव या भागातील कारखाने, देवस्थानांची तपासणी केली असून, पुणे परिसरातील 19 कारखान्यांना कारखाने बंद करण्याची नोटीस दिली आहे.

मात्र, “या कारवाईदरम्यान जप्त केलेला माल हा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ताब्यात दिला असून, त्या संस्थांनी प्लॅस्टिक माल “क्रश’ करून त्याची इंधननिर्मितीसाठी विक्री करायची,’ असे मंडळातर्फे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे सांगतात. तर दुसरीकडे जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असल्याने, आम्ही त्याबाबत काही करू शकत नाही, असे सांगत प्रशासनातर्फे हात वर केले जात आहे. या दोन्हींमधील वादात जप्त केलेला माल हा कार्यलयांमध्ये तसाच पडून आहे. त्यामुळे आता हे काम नेमके कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्य प्रदूषण मंडळाने केलेली कारवाई:

– प्लॅस्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या 19 कंपन्यांना बंद करण्याची नोटीस

– पुणे परिसरात एक हजार दुकानांवर कारवाई

– विक्रेत्यांकडून 303. 36 टन प्लास्टिक पिशव्या,वस्तू जप्त

– 14 लाख 56 हजार रुपये दंड जमा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)