जप्त केलेले वाळूचे तीन ट्रक चोरट्याकडून लंपास

पुणे, दि.7 – हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेले वाळूचे तीन ट्रक चोरण्यात आले. विशेष म्हणजे हे कार्यालय पोलीस आयुक्‍तांच्या निवासस्थानासमोरच आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाठी गौतम ढेरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान घडली. फिर्यादीने मंडल अधिकारी व इतर तलाठ्यांच्या सहकार्याने मुंढवा येथील शिवाजी चौकातून वाळूची अनधिकृत वाहतूक करणारे पाच ट्रक ताब्यात घेतले होते. या ट्रक चालकांकडे परवाना व रॉयल्टीची पावती नव्हती. यामुळे तहसिलदारांच्या आदेशानुसार हे ट्रक कारवाई करून हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते. यातील तीन ट्रक वाळूसह चोरून नेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. व्ही. शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)