जप्तीप्रकरणी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा

पिंपरी – नियमबाह्य जप्ती केल्याची तक्रार दिल्यामुळे पंतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी क्रांती शरद पवार (वय-30, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली असून, अतुल काकडे, कुमार अल्हाट, महिला मतस्लीन शिखिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डोळसनाथ पतसंस्थेमार्फत वैयक्‍तिक कर्ज घेतले होते. या कर्जाचे दोन महिन्यापासून हप्ते थकले होते. मात्र, संबंधित पतसंस्थेने या प्रकरणी फिर्यादी क्रांती यांना कोणतीही जप्तीची किंवा कारवाईची नोटीस दिली नाही. असे असतानाही क्रांती यांच्या दुकानात आले व त्यांनी दुकानातील महिला कर्मचाऱ्यांना दुकानाबाहेर काढत दुकानाच्या शटरवर श्रद्धा क्रियेशन नावाचा कागदी बोर्ड लावला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)