जपान व कोलंबिया बाद फेरीत दाखल

व्होल्गोग्रॅड – जपान आणि पोलंड यांच्यातील एच गटातील अखेरच्या सामन्यात पोलंडने जपानचा 1-0 असा पराभव करताना आपला शेवट गोड केला. मात्र पराभवानंतरही जपान बाद फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात कोलंबियाने सेनेगलचा 1-0 असा पराभव करून बाद फेरी गाठली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील एच गटामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पोलंडने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. दुसऱ्या सत्रात जॅन बेडारेकने केलेल्या गोलच्या जोरावर जपानचा 1-0 असा पराभव केला, मात्र पराभवानंतरही जपानने दुसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली.

दुसऱ्या सामन्यात येर्री मिनाने 74व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर कोलंबियाने सेनेगलचा 1-0 असा पराभव करताना बाद फेरीत प्रवेश मिळविला. जपान व सेनेगल या दोघांचेही प्रत्येकी 4 गुण झाले. परंतु सरस गोलफरकामुळे जपानने दुसरा क्रमांक निश्‍चित करताना बाद फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)