जपान मधील भुकंपबळींची संख्या 30 वर

टोकिओ – उत्तर जपान मध्ये गेल्या 30 तारखेला बसलेल्या भुकंपात ठार झालेल्यांची संख्या 30 झाली आहे. या भूकंपामुळे या भागात मोठी पडझड झाली असून त्याचे ढिगारे उपसण्याचे काम हजारो लोक रात्रंदिवस करीत आहेत. हे ढिगारे उपसताना त्यात काही मृतदेही सापडत आहेत.

यातील बहुतेक बळी अस्तुमा गावातील आहेत. तेथे डोंगराच्या बाजुला राहात असलेल्या लोकांच्या घरांवर डोंगराच्या कडा या भूकंपात कोसळल्या त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची नोंद 6.6 इतकी झाली आहे.

या भागात झालेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे तेथे यापुर्वी इतक्‍या मोठ्या प्रमाणात भुकंपाने दरडी कोसळण्याचे प्रकार घडले नव्हते. या ठिकाणच्या लोकांच्या मदतीसाठी चाळीस हजार लोकांची मदत पथके, 75 हेलिकॉप्टर्स आणि अन्य सरकारी यंत्रणा राबत आहे. या गावातील आणखी नऊ जण बेपत्ता असून तेही या ढिगाऱ्या खाली अडकले असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)