जपानपाठोपाठ चीनला भूकंपाचा धक्का; 14 जखमी

बीजिंग – जपानपाठोपाठ चीनला आज भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे घरे कोसळण्याच्या घटना घडून 14 जण जखमी झाले. रिश्‍टर स्केलवर त्या भूकंपाची तीव्रता 5.9 इतकी नोंदली गेली. चीनच्या नैऋत्येकडील युन्नान प्रांताला प्रामुख्याने भूकंपाने हादरवले. भूकंपानंतर तब्बल 55 आफ्टरशॉक्‍स बसल्याने नागरिकांच्या घबराटीत भर पडली.

भूकंपाचा धक्का बसल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव कार्य हाती घेतले. काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा आणि दूरध्वनी सेवा युद्धपातळीवर पूूर्ववत करण्यात आली. दरम्यान, फिलिपाईन्स देशाच्या दक्षिणेकडील भागांनाही आज भूकंपाने हादरवले.

सुदैवाने त्यात कुठली जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रिश्‍टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदली गेली. हा धक्का जाणवलेल्यांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून इमारतींबाहेर धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)