जपानचे माजी पंतप्रधान यसुहिरो नकासो यांनी पूर्ण केले वयाचे शतक

टोकियो (जपान) – जपानचे एक माजी आणि अत्यंत यशस्वी व सन्माननीय पंतप्रधान यसुहिरो नकाशी यांनी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. त्यांनी आजच आपला वाढदिवस साजरा केला. वयाची शंभरी पार केली, तरी त्यांची प्रकृती आजही अत्यंत ठणठणीत आहे. टोकियोमध्ये राहणाऱ्या यसुहिरो यांची मुलगी त्यांची देखभाला करत असते. ते जपानचे सर्वात दीर्घायुषी पंतप्रधान झाले आहेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यसुहिरो नकाशी जपानच्या नौदलातील एक नौसेना अधिकारी होती. त्यांनी जपानचा विजयरथ रोखल्याचे आणि जपानची हार पाहिली आहे. हिरोशिमा आणि नागासाकीचा झालेला विनाश आणि विनाशातून फिनिक्‍सप्रमाणे पुन्हा उभारलेला जपान त्यांनी पाहिला आहे. ते पंतप्रधान असताना, 80 च्या दशकात जपान आपल्या आर्थिक प्रगतीच्या शिखरावर होता.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपानच्या पुनर्निर्मितीसाठी काम केल्याने आणि जपानचा भरभराटीत व प्रगतीत सहभागी होता आल्याचे आपल्याला फार समाधान वाटत आहे, असे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण जगात जपानी लोकांचे आयुष्यमान सर्वात जास्त आहे. जपानी लोकांचे सरासरी आयुष्यमान आणि शतायुषी नागरिकांची संख्या जगात सर्वाधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)