जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशी नरेंद्र मोदींची चर्चा

यामान्शी (जपान): जपानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशी आज अनौपचारिक चर्चा केली. माऊंट फुजी जवळच्या रिसॉर्टमध्ये ही चर्चा झाली. मोदी यांच्या स्वागतासाठी ऍबे यांनी उपहाराचे आयोजन केले होते. मोदी यांनीही ऍबे यांना राजस्थानातील हस्तकला असलेले 2 बाऊल. जोधपुरी लाकडी भेटवस्तूंची भेट दिली.

आपल्या जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी औद्योगिक रोबो निर्मितीच्या फॅक्‍टरीलाही भेट दिली. संध्याकाळी ऍबे यांनी मोदी यांच्यासाठी यामान्शी या आपल्या मूळ गावी खासगी भोजन समारंभाचे आयोजन केले होते. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ऍबे भारता आले असता मोदी त्यांना गुजरातमध्ये आपल्या मूळ गावी नेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत- जपानदरम्यानच्या 13 व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांचे काल संध्याकाळी जपानमध्ये आगमन झाले. दोन्ही देशांमधील भागीदारी मूलभूतपणे विकसित झाली आहे, असेही ते म्हणाले. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)