जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पत्नीसह दिली साबरमती आश्रमाला भेट

साबरमती : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधून ८ किलोमीटरचा रोड शो करत मोदी आणि आबेंनी साबरमती आश्रमाला भेट दिली.
आश्रमातल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेला खादीच्या धाग्यांचा हार अर्पण करून दोघांनी अभिवादन केले. त्यानंतर आश्रमातल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली. त्यानंतर आबे दाम्पत्य आणि मोदींनी अहमदाबादमधल्या सीदी सैय्यद मशिदीला भेट दिली. मोदींचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे उद्या भूमीपूजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मोदींनी अहमदाबाद विमानतळावर शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. मोदींनी शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नीचं यांचं अहमदाबाद विमानतळावर स्वागत केलं. आबे यांना अलिंगन देत मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी आबेंना विमानतळावरच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.
एअरपोर्टपासून साबरमती आश्रमपर्यंत जवळपास ८ किलोमीटर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे रोड शो केला. रोड शो दरम्यान २८ ठिकाणी ३० हून अधिक स्टेज बनवण्यात आले होते. या स्टेजवरून वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)